Temple Dress Code : छत्रपती संभाजीनगरमधील मंदिरांमध्येही आता 'ड्रेसकोड'; पाहा फोटो
आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील काही मंदिरात देखील अशी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंभाजीनगर शहरांतील वेगवेगळ्या 20 मंदिरात ड्रेसकोडबाबत फलक लावण्यात आले आहे.
शहरातील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत.
मंदिरात प्रवेश करताना भारतीय परंपरेला शोभणारीच वस्त्रे परिधान करावीत, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे.
अश्लील, बीभत्स, उत्तेजक वस्त्र परिधान करू नयेत, असे निर्णय घेत त्याबाबत मंदिरात फलक लावण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात देखील असेच फलक लावण्यात आले आहे.
शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक पाहायला मिळत आहे.
फॅशनच्या नावाखाली तरुणींनी गुडघ्यापर्यंत स्कर्ट तसेच लोअर घालून मंदिरात येऊ नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहेत.