Pankaja Munde : औरंगाबादमधून पंकजा मुंडे यांच्या ‘शिव-शक्ती परिक्रमा’ दौऱ्याची सुरुवात

शिव-शक्ती परिक्रमेला सुरुवात करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी सकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गारखेडा परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तसेच वेरुळ येथील श्री घृष्णेश्वरला निघण्यापूर्वी पंकजा मुंडे या गारखेडा परिसरात गजाजन कॉलनी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी संत भगवान बाबांना वंदन केले. यावेळी मंदिरात जाऊन दर्शन व आरतीही केली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी वाजतगाजत जोरदार स्वागत केले.
तर ‘शिव-शक्ती परिक्रमा’ दौऱ्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी आज शिव-शक्ती परिक्रमा सुरु केली.
भक्ती आणि शक्तीच्या संगमाचा अलौकिक अनुभव घेत आहे. शिव आणि शक्तीच्या दर्शनाबरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी ही परिक्रमा आहे. जनतेचे हे प्रेम अबाधित राहो, असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘शिव-शक्ती परिक्रमा’ दौऱ्यात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बेट कोपरगांव येथे सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात जाऊन पंकजा मुंडे यांनी गुरू शुक्राचार्यांचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने पंकजा मुंडे यांचे स्वागत झाले. यावेळी मुंडे यांनी स्वागत व्यासपीठावर जाऊन ग्रामस्थांना संबोधित केले.
‘शिव-शक्ती परिक्रमा’ दौऱ्यात माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे व कोल्हे परिवाराच्या वतीने कोपरगाव येथे पंकजा मुंडे यांचे करण्यात आले.
यावेळी कोपरगाव मतदारसंघातील सोनारी व विविध ठिकाणांहून आलेल्या ग्रामस्थांनी देखील स्वागत करुन शिव-शक्ती परिक्रमेला शुभेच्छा दिल्या.