थेंब-थेंब पाणी टाकून पिकं जगवण्यासाठी बळीराजाची धरपड, पाहा फोटो
मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात आता पीक माना टाकत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिकांना जगवण्यासाठी बळीराजा थेंब थेंब पाणी घालतांना पाहायला मिळतोय. असंच काही चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावात पाहायला मिळत आहे.
अख्ख शेतकरी कुटुंब हातात बकीटी, तांब घेऊन एक एक झाडाला पाणी टाकून जगवण्याचं प्रयत्न करतोय.
पण, अशी धडपड किती दिवस करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी 20 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे.
पिकं आता माना टाकतांना पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यासह विभागात पाहायला मिळत आहे.
त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने झाडांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते.
पण आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाऊस होत नसल्याने डोळ्यासमोर पिकं उध्वस्त होत असल्याने त्याला जगवण्यासाठी बळीराजा धरपड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.