गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एका लग्नात फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना लग्नाच्या सेटलाच आग लागल्याची घटना घडली.
Continues below advertisement
Maratha Vinod pattil save life sambhajinagar
Continues below advertisement
1/8
छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एका लग्नात फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना लग्नाच्या सेटलाच आग लागल्याची घटना घडली.
2/8
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे दुसऱ्या घटनेत थोडक्यात बचावले आहेत. संभाजीनगरमधील एका आईस्क्रीमच्या दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले असता सुदैवाने दुर्घटना घडली.
3/8
विनोद पाटील येथे आले असता उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी गॅसचे फुगे आणण्यात आले होते. मात्र, नेमकं विनोद पाटील या फुग्यांजवळ येताच अचानक गॅसचे फुगे फुटल्याने मोठा स्फोट झाला.
4/8
गॅसचे फुगे फुटल्याने चांगलाच भडका उडाला अन् विनोद पाटील तात्काळ बाजुला सरले, त्यामुळे, ते आणि तेथील उपस्थितही थोडक्यात बचावले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
5/8
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली असून लग्नात फटाके फोडणे चांगलेच महागात पडल्याचं दुसऱ्या घटनेत पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement
6/8
लग्नाच्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे येथील लग्नाच्या सेटलाच आग लागल्याची घटना घडली आहे, फटाक्यामुळे सेटला चांगलीच आग लागल्याने वऱ्हाडी मंडळी घाबरली होती.
7/8
शहरालगत असलेल्या पडेगावमधील ही घटना घटना असून नवरदेव-नवरी थोडक्यात वाचले. लग्नात उपस्थित लोकांनी आग आटोक्यात आणली, या लग्नात जवळपास 4 हजार लोक होते उपस्थित होते.
8/8
दरम्यान, या घटनेनं लग्नातील वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धांदल उडाली होती, वऱ्हाडी मंडळींमधील काहींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला
Published at : 06 Dec 2025 08:42 PM (IST)