G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-20 बैठकीला सुरुवात, पाहा फोटो
सोमवार (27 फेब्रुवारी, 2023) पासून या बैठकांना सुरूवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत या बैठकीचे उद्घाटन झाले.
ज्यात W20 इंडियाने नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगांमध्ये महिलांचे सक्षमीकरण यावर पहिले सत्र आयोजित केले.
‘हवामानानुसार कृतीत बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात जागतिक स्तरावर धोरण आखताना लिंगभेद करू नये हे अधोरेखित करण्यात आले.
तिसर्या सत्रात, राजकीय आणि सार्वजनिक नेतृत्वात तळागाळातील मुली आणि महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करण्यातील आव्हाने आणि मार्ग ओळखण्यासाठी ‘तळागाळातील महिला नेत्यांसाठी सक्षम पारिस्थितिक प्रणाली तयार करणे’ यावर लक्ष केंद्रित केले गेले.
चौथ्या सत्रात 'इम्प्रूव्हिंग ऍक्सेस थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर अँड स्किल टू ब्रिज द जेंडर डिजिटल डिव्हाईड' या विषयावरील चर्चेत लिंग आधारित डिजिटल भेदभाव दूर करणे, यावर चर्चा झाली.
W20 इंडियाच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी या सत्राचा प्रारंभ करताना महिलांना त्यांचे स्वतःचे उद्योग उभारण्यात आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करणारा iWN365 उपक्रम सुरू केला.
या बैठकीत जगभरातील वेगेवेगळ्या महिला पाहुण्यांनी हजेरी लावली.