G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून जी-20 महिलांची परिषद
आज सकाळी 09.30 वाजल्यापासून हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यासाठी 19 पैकी 15 देशांच्या महिला प्रतिनिधींचे कालपर्यंत आगमन झाले होते.
महिलांच्या नेतृत्वात देशांचा विकास आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी प्रमुख 6 मुद्द्यांवर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे.
सुरुवातीच्या या बैठकीत विविध विषयांवर आयोजित पॅनल चर्चासत्रांमध्ये सहभागी सदस्य आपले विचार मांडतील.
वुमन-20 च्या उद्घाटनपर बैठकीला महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, स्मृती इराणी उपस्थित राहणार
उपस्थित मान्यवरांसमोर त्या लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर स्मृती इराणी आपले विचार मांडतील.
या परिषदेत महिलांसाठी पायाभूत सुविधा, जेंडर डिजिटल डिव्हाईज दूर करणेबाबत चर्चा होणार आहे.
महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ, आर्थिक सक्षमीकरण, हवामानातील बदल, सक्षम प्रणाली, कौशल्य विकास या विषयांवर चर्चा होणार आहे.