Photo: नाथषष्ठी! नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यास सुरुवात, पाहा फोटो
मराठवाड्यातील महत्वाच्या यात्रेपैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणची (Paithan) यात्रा म्हणजेच नाथषष्ठी यात्रेला (Nath Shashti Festival) सुरुवात झाली आहे. (सर्व छायाचित्र- आशिष तांबटकर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते पवित्र रांजणाची विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर गुरुवारी भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला.
असे म्हणतात की, शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या (Sant Eknath Maharaj) वाड्यातील रांजणात भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्याच्या रुपाने गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरला होता.
तर त्याच पवित्र रांजणाची विधिवत पूजा करुन त्यात पाणी भरण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली.
रांजण भरण्यास सुरुवात होताच नाथषष्ठी महोत्सवास औपचारिक प्रारंभ झाला.
तसेच हा रांजण ज्या दिवशी भरतो, त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांची वारकऱ्यांची धारणा आहे.
ज्याच्या हातून पवित्र रांजण भरला जातो, त्यास भगवान श्रीकृष्ण माणून नाथवंशजांच्यावतीने मान देण्यात येतो.
त्यामुळे रांजण भरण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
तर 13 ते 15 मार्च दरम्यान नाथषष्ठी यात्रेचा प्रमुख सोहळा संपन्न होणार आहे.