Photo: नामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम'
औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र याच निर्णयावरुन आता राजकारण तापले आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
तर आजपासून (4 मार्च) जलील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
तर हे बेमुदत संप कधीपर्यंत सुरु राहिल हे सांगता येणार नसल्याचं देखील जलील यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे.
यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
जलील यांनी शुक्रवारी उपोषणस्थळाची पाहणी करत आढावा घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी जलील यांच्याची चर्चा करत उपोषणाबाबत आढावा घेतला आहे.
सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी जलील यांच्यासोबत चर्चा करत उपोषण कसे असणार, किती लोक येण्याची शक्यता आहे, याबाबत माहिती जाणून घेतली आहे.
तर मनसेकडून नामांतराच्या समर्थनात आज स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे.