Photo: 'मविआ'च्या सभेला काही तासांचा कालावधी, पाहा सभेची तयारी ड्रोनच्या माध्यमातून

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात आज महाविकास आघाडीच्या पक्षाची एकत्रित सभा होत आहे. तर या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. (ड्रोन सौजन्य गौरव जेजुरकर)

Photo: 'मविआ'च्या सभेला काही तासांचा कालावधी, पाहा सभेची तयारी ड्रोनच्या माध्यमातून

1/8
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आज एकत्रित सभा छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडत आहे.
2/8
महाविकास आघाडीच्या सभेची संपूर्ण तयारी जवळपास झाली असून, कार्यकर्ते सभास्थळी यायला सुरवात झाली आहे.
3/8
शहरातील खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात ही महाविकास आघाडीची सभा होणार आहे.
4/8
सभेच्या ठिकाणी भलामोठा स्टेज उभारण्यात आला असून, यावर तीनही पक्षाचे फोटो असलेले होर्डिंग पाहायला मिळत आहे.
5/8
सभा असलेल्या मैदानात 30 हजार पेक्षा अधिक खुर्च्या लावण्यात आल्या असून, सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
6/8
सभेच्या ठिकाणी आणि परिसरात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची एकत्रित लावलेले झेंडे लावण्यात आल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
7/8
विशेष म्हणजे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात महाविकास आघाडीची सभा होणार आहे, त्या मैदानात यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा गाजलेल्या आहेत.
8/8
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा गाजल्या होत्या.
Sponsored Links by Taboola