Photo : छ.संभाजीनगरच्या सिडकोतील विविध ठिकाणी अतिक्रमणे काढली, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज सिडको एन-4 भागात कारवाई करण्यात आली.
Photo : छ.संभाजीनगरच्या सिडकोतील विविध ठिकाणी अतिक्रमणे काढली, पाहा फोटो
1/8
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एन- 4 भागात 15 बाय 15 आकाराच्या चार दुकानांचे शटर निष्काशीत करून अतिक्रमणे काढण्यात आली आहे.
2/8
चारही दुकाने सामाजिक अंतरामध्ये होती तसेच या भागातून 04 टपऱ्या काढण्यात आल्या. तसेच इतर अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
3/8
शहरातील एन-08 परिसरातील मुख्य रस्त्यालगत एकूण 06 शेड काढून तीन दुकाने निष्कशीत करण्यात आली आहे.
4/8
यानंतर दुपारी एन- 10 मधील पोलीस मेसपर्यंत दहा बाय दहा आकाराचे 4 पत्र्याचे शेड काढण्यात आले आहे.
5/8
यामध्ये रस्त्यावर व रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये चार चाकी वाहनाविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच रस्त्यावरील बंद असलेली भंगार वाहने जप्त करण्यात आली.
6/8
महानगरपालिकेच्या पथकाकडून कारवाई करत तीन लोखंडी टपऱ्या हटविण्यात आल्या, तर एक गाडी जप्त करण्यात आली.
7/8
तसेच अतिक्रमण हटवा पथकाच्या वतीने मुख्य रस्त्यावर असलेल्या चार थंड पेय सोडा गाडी व एक रसवंती हटविण्यात आली.
8/8
विशेष म्हणजे यापुढे देखील अशाच कारवाया सुरु राहणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Published at : 21 Mar 2023 10:12 PM (IST)