Photo : छत्रपती संभाजीनगर शहरात 'ईडी'कडून छापेमारी, पाहा फोटो
छत्रपती संभाजीनगर शहरातून (Chhatrapati Sambhaji Nagar City) मोठी बातमी समोर येत असून, ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
तर आज पहाटेच ईडीने शहरातील नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
कारवाईसाठी आलेले अधिकारी विमानाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'ईडी'चे अधिकारी पाच वेगवेगळ्या गाड्यांमधून शहरात दाखल झाले.
शहरातील वेगवेगळ्या नऊ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे.
ईडीच्या पथकाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदासंबधित बिल्डरांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे.
शहरातील नारळीबाग परिसरातील अमर बाफना यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.
तसेच शहरातील कॅनॉट परिसरात देखील छापे टाकण्यात आले आहेत.
तसेच एका रुग्णालयात देखील छापे टाकून, ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.
याठिकाणी स्थानिक पोलिसांचा देखील विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.