छ. संभाजीनगर महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधात कारवाई, पाहा फोटो
छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या दणक्यानंतर महानगरपालिका कामाला लागली असून, अतिक्रमण हटाव विभागाने शहरातील अनेक भागातील अतिक्रमण काढून त्यावर जेसीबी फिरवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरातील टीव्ही सेंटर, कॅनॉट परिसरातील बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण महानगरपालिका पथकाने काढून घेतले आहेत. सोबतच रस्त्यावर लावण्यात आलेल्या गाड्या देखील काढण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी विवेकानंद नगर गार्डन समोरील एन-13 परिसरात अतिक्रमण पथकाने नागरिकांचे मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सूचना देऊन त्यांना अतिक्रमित जागेची मार्किंग करून दिली होती.
तसेच अतिक्रमणामध्ये रसवंती गृह, पंक्चरचे दुकान, दहा बाय दहा बाय पंधराचे कंपाउंड वॉल आणि लोखंडी जीने काढणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
यानंतर सदर पथकाने महानगरपालिकेच्या मालकीच्या टीव्ही सेंटर मार्केट परिसरातील हॉटेल स्वराज्यच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या दोन लोखंडी टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
सोबतच कॅनॉट परिसरातील एकूण 13 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.या परिसरातील उद्यानाच्या बाजूला असलेला फुटपाथ मोकळा करण्यात आला.
याठिकाणी असलेले सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी अतिक्रमण धारकांनी पथकाशी मोठ्या प्रमाणावर वाद घातला. परंतु पथक प्रमुख वसंत भोये यांनी यास न जुमानता कारवाई सुरू ठेवली यामुळे फुटपाथ मोकळा झाला आहे.
तसेच शहरातील हडको टीव्ही सेंटर परिसरातील तीन रस्त्यावरचे शेड काढण्यात आले आहेत. दोन चारचाकी मोठ्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.