Photo : छत्रपती संभाजीनगरमधील 75 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण काढत पुन्हा एकदा महानगरपालिकेने कारवाई केली आहे.

Photo : छत्रपती संभाजीनगरमधील 75 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई

1/8
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आले.
2/8
शहरातील सिडको एन-5, एन-6आणि एन-8 परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.
3/8
यावेळी केलेल्या कारवाईत एकूण 75 अनधिकृत बांधकाम धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
4/8
बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक या भागात एकूण 26 अनधिकृत कच्चे पक्के बांधकामे काढण्यात आले होते.
5/8
यामध्ये नागरिकांनी आपल्या घरासमोरील पार्किंगच्या जागेत आणि सामासिक अंतरात अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केले होते.
6/8
यासाठी 20 नागरिकांना 24 तासाचा महाराष्ट्र महानगरपालिका एमआरटीपी अॅक्ट अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.
7/8
यामध्ये या लोकांनी रस्त्यावर वॉशिंग सेंटर, लहान बियर शॉपी ,कॉस्मेटिक दुकाने मेडिकल शॉप, ज्यूस सेंटर अशा स्वरूपाची अतिक्रमण केले होते.
8/8
या सर्व अतिक्रमणधारकाविरुद्ध कारवाई करून काही किरकोळ स्वरूपातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Sponsored Links by Taboola