Photo: विहिरीला मंजुरी मिळेना, सरपंचाने चक्क दोन लाखाच्या नोटा उधळल्या
हा तरुण सरपंच एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील हा व्हिडिओ असून, मंगेश साबळे असे या तरुण सरपंचाचे नाव आहे.
गटविकास अधिकारी यांनी विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने, त्यांच्या कार्यालयासमोर दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा दावा या सरपंचांने केला आहे.
विशेष म्हणजे त्याने गळ्यात नोटांचा हार घालत पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर पैसे उधळले असल्याचे पाहायला मिळाले.
वेगवेगळ्या शासकीय योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. सद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहे.
मात्र फुलंब्री तालुक्यात अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान असेच काही फुलंब्री तालुक्यातील गेवराई (पायगा) येथील गावकऱ्यांसोबत घडत असल्याचा आरोप या गावचा सरपंच मंगेश साबळे याने केला आहे.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने अनोखं आंदोलन केले आहे. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटाचा हार गळ्यात घालून तो पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल झाला.
त्यानंतर त्या नोट्या कार्यालयाच्या परिसरात उधळून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेध करत असल्याचा दावा केला.