Photo : छ. संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाची पाहणीसाठी स्वतः आयुक्त उतरले रस्त्यावर
सिडकोतील अतिक्रमण हटाव कारवाईचा आढावा घेण्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी हे मंगळवारी सायंकाळी स्वतः रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अचानक कॅनॉट प्लेस भागात तासभर फिरून पाहणी केली.
यावेळी वॉक वे गिळंकृत करणाऱ्या चार हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी यावेळी दिले.
उच्च न्यायालयाने सिडकोतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने महिनाभरापूर्वी सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.
आतापर्यंत शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. कॅनॉट प्लेस भागातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती.
तसेच या भागात अनधिकृत पार्किंग होऊ नये याबाबत त्यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिले.
यावेळी वॉक वेची पाहणी केली. तिथे हॉटेल राणा, हॉटेल मराठा, हॉटेल व्हीआयपी मराठा आणि हॉटेल शिवमुद्रा यांनी वॉक वे गिळंकृत केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई आदेश आयुक्तांनी दिले.