Leopard In Chhatrapati Sambhajinagar: शेतपंप चालू करण्यासाठी जाताच हालचाल; बारकाईने बघताच विहिरीत बिबट्या दिसला, वैजापूरमधील घटना, पुढे काय घडलं?, PHOTO

Leopard In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातून एक घटना समोर आली आहे. दाणे वस्तीवरील एका शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता.

Continues below advertisement

Leopard In Chhatrapati Sambhajinagar

Continues below advertisement
1/7
Leopard In Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातून एक घटना समोर आली आहे. दाणे वस्तीवरील एका शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता.
2/7
दाणे वस्तीवरील शेतकरी गणेश मलिक हे नेहमीप्रमाणे शेतातील विहिरीत असलेला शेतपंप सुरू करण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीत हालचाल दिसून आली.
3/7
बारकाईने पाहिल्यानंतर विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली.
4/7
काही वेळातच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगत विहिरीत बाज सोडून बिबट्याला आधार देण्यासाठी मदत केली आणि वन विभागाला घटनेची माहिती देण्यात दिली.
5/7
सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
Continues below advertisement
6/7
वन विभागाकडून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले आणि अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
7/7
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र बिबट्या सुखरूप जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
Sponsored Links by Taboola