Independence Day 2023: पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते औरंगाबादेत शासकीय ध्वजारोहण; पाहा फोटो
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोहळ्यास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत सादर झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला.
याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाबाबत नव्या पिढीपर्यंत माहिती पोहोचविणे, तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना व अभियानांमधून लोकांपर्यंत अधिकाधिक लाभ पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात फलोत्पादन योजना, रोजगार हमी योजना सारख्या योजनांमधून तळागाळातील शेतकरी, ग्रामिण जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यात आल्याचे भुमरे म्हणाले.
तर, पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण जल उपसा सिंचन प्रकल्प भाग-2 मधील मौजे राहटगाव व सोलनापूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मावेजा धनादेश वाटप आज करण्यात आले