Hindu Jan Akrosh Morcha : औरंगाबादच्या फुलंब्रीत निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा; हजारो नागरिक उपस्थित
Hindu Jan Akrosh Morcha : मागील काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे.
Hindu Jan Akrosh Morcha
1/9
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात देखील आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
2/9
लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर अशा अनेक विषयांच्या विरोधात हा मोर्चा निघाला होता.
3/9
महिन्याभरापासून या मोर्चाची तयारी करण्यात येत होती. यासाठी अनेक बैठका देखील आयोजकांकडून घेण्यात आल्या. अनेक गावात यासाठी बैठका झाल्या.
4/9
दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला होते.
5/9
बाजार समिती प्रवेश द्वारावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मोर्चाला प्रारंभ झाले. तर खुलताबाद रस्त्यावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
6/9
दरम्यान यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक हिंदू जन आक्रोश मोर्च्यात सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळाले.
7/9
या मोर्चात तरुणांची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळाले. फुलंब्री तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील तरुण मोर्चात सहभागी झाले होते.
8/9
विशेष म्हणजे मोर्चात महिलांची संख्या देखील लक्षणीय असल्याचे दिसून आले. तर तरुणींनी देखील या मोर्चात सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
9/9
तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले होते.
Published at : 30 Jul 2023 02:32 PM (IST)