धुक्यात हरवली जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, पांढरेशुभ्र धबधबे झाले प्रवाही; मनमोहक निसर्ग सौंदर्याचे Photo पाहाच
पर्यटकांचे आकर्षण स्थान म्हणून ओळखला जाणारा लेणी क्रमांक 29 येथील सीत न्हानी असलेला धबधबा आणि लेणी क्रमांक 10 जवळील धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलेणी परिसरातील वाहणारे धबधबे बघण्यासाठी शनिवार रविवार असलेल्या सुट्टीमुळे वेरूळ येथे पर्यटन वाढण्याची शक्यता आहे.
हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे विशेष आकर्षण असतो. यामुळे पर्यटकांत आनंदांचे वातावरण निर्माण झालं आहे.
गेल्या आठवड्यात रिमझिम पावसामुळे वेरूळ लेणी आणि परिसरातील धबधबे डोंगर कड्यांवरून ओसंडून वाहत आहेत.
खुलताबादपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ लेणी परिसरातील सीता न्हानी धबधबा पांढऱ्या शुभ्र जलधारांनी ओसंडून वाहत आहे.
दरवर्षी येथे मोठ्या संख्येत पर्यटक येतात. धबधब्याच्या दिशेने जाणारी वाट मात्र काहीशी बिकट आहे.ती पार करून हौशी पर्यटक दरवर्षी धबधब्याकडे पोहोचतात.
या ठिकाणी पर्यटक पाण्यात उतरण्याचा मोह आवरून धबधब्याचे मोहमयी नेत्रसुख घेण्यात धन्यता मानतात.