PHOTO : मराठा आरक्षणासाठी दिव्यांग तरुणाचे थेट कळसुबाई शिखरावर उपोषण
मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीसाठी गावागावात आंदोलन केले जात आहे. प्रत्येकजण होईल त्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधून घेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी एका दिव्यांग तरुणाने थेट कळसुबाई शिखरावर उपोषण सुरु केले आहे.
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून शिवाजी गाडे या दिव्यांग तरुणाने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या सर्वोच्च कळसुबाई शिखरावर उपोषण सुरू केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलने सुरू असून, अशाच प्रकारचे लक्षवेधी आंदोलन पैठणच्या दिव्यांग तरुणाने सुरू केले आहे.
या दिव्यांग तरुणाने उपोषणासाठी 1646 मीटर अर्थात 5400 फुट उंच असलेल्या कळसुबाई शिखराची निवड करुन उपोषण सुरु केले आहे.
रात्रीच्या किर्र अंधारात आणि कडाक्याच्या थंडीसह दिवसा रखरखत्या उन्हात या तरुणाकडून उपोषण करण्यात येत आहे.
शुक्रवार (27 ऑक्टोबर) ते रविवार (29 ऑक्टोबर) असे सलग तीन दिवस हे उपोषण करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जातीय 30 लाख, तर मराठा समाजाच्या 15 लाख दिव्यांगांच्या वतीने प्रातिनिधिक प्रतिनिधी म्हणून हे आंदोलन छेडल्याची प्रतिक्रिया शिवाजी गाडे यांनी दिली आहे.