Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले

Chhatrapati Sambhajinagar road accident: बिअरच्या डिलिव्हरी ट्रकचा भीषण अपघात, ड्राईव्हरचा जीव वाचवायचं सोडून नागरिकांनी पळवल्या बाटल्या, संतापजनक घटना

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar accident

Continues below advertisement
1/12
छत्रपती संभाजनगरमधील वाळूज येथील रांजणगाव फाटा परिसरात शुक्रवारी बिअरची वाहतूक करणारा ट्रक उलटला.
2/12
या अपघातामुळे ट्रक आडवा पडून त्यामधील बिअरच्या बाटल्याचे खोके रस्त्यावर पडले. या बाटल्या गोळ्या करण्यासाठी स्थानिक नागरिकांना प्रचंड मोठी गर्दी केली होती.
3/12
एमआयडीसी वाळूज परिसरातील रांजणगाव फाटा येथे हा बिअरचा ट्रक पलटी झाला.
4/12
जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिकांची बिअरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी धडपड सुरु होती.
5/12
शेकडो नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रक मधील पडलेले बिअरचे बॉक्स तसेच बॉटल्स पळवल्या.
Continues below advertisement
6/12
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनीतातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली.
7/12
हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
8/12
हा अपघात इतका भीषण होता की, पलटी झाल्यामुळे ट्रकमधून रस्त्यावर बियरच्या बॉटलचा सडा पडला.
9/12
या अपघातात बिअरच्या अनेक बाटल्या फुटल्या. त्यामुळे रस्त्यावर बिअरचा वास पसरला होता.
10/12
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काचेचे तुकडे आणि बियर सांडल्याचे चित्र दिसत होते.
11/12
मात्र, या सगळ्यात मद्यप्रेमी बिअरच्या बाटल्या गोळा करण्याची धडपड करत होते.
12/12
बिअरच्या बाटल्या भरण्यासाठी काहीजणांना गोण्या आणि पिशव्या आणल्या होत्या.
Sponsored Links by Taboola