Aurangabad: बजरंग दलाकडून कॉमेडियन फारुखीचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न, पाहा फोटो
बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांकडून औरंगाबादमध्ये मुनव्वर फारुखीचा शो बंद करण्यासाठी प्रयत्न झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत केलेल्या मध्यस्थीने शो पुन्हा सुरू करण्यात आला होता.
शनिवारी औरंगाबादच्या निराला बाजार परिसरात असलेल्या तापडिया नाट्यमंदिरात हा प्रकार घडलं.
विशेष म्हणजे शो बंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 5 ते 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
औरंगाबादच्या तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी सायंकाळी 4 वाजता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी याचा शो आयोजित केला गेला होता.
दरम्यान, औरंगाबादमध्ये शनिवारी त्याचा शो ठेवण्यात आल्याने यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याच्या याच शोसाठी ऑनलाइन तिकीट विक्री झाली होती.
ठरल्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी फारुखीचा तापडिया नाट्यमंदिरात शो सुरू झाला.
तर याबाबत माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते तापडिया नाट्यमंदिरात दाखल झाले. तसेच त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
याबाबत माहिती मिळताच क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना तेथून काढण्याचा प्रयत्न केला.
तसेच पोलिसांनी घोषणाबाजी करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला. परंतु बजरंग दलाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते.
तर, याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यकर्त्यांची समजूत घालत पुन्हा शो सुरू करण्यास परवानगी दिली.
तसेच, यावेळी 5 ते 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.