PHOTO: बागेश्वर धाम बाबा संभाजीनगरात; तीन दिवस भरणार 'दरबार'
बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्री राम, श्री हनुमान कथेला आजपासून रेल्वेस्टेशन येथील अयोध्यानगरी मैदानावर प्रारंभ झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे शहरात अगमन झाले. चिकलठाणा विमानतळावर येताच हनुमानांची गदा घेत त्यांनी जय श्रीरामची घोषणा दिली.
यावेळी स्वागतासाठी जमलेल्या हजारो नागरिकांनी सियावर रामचंद्र की जयच्या घोषणा देत परिसर दणाणून टाकला.
दरम्यान, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड व गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांनी महाराजांचे स्वागत केले.
तर, आज शेकडो महिलांची कलश यात्रा क्रांती चौक येथून अयोध्यानगरीपर्यंत निघाली होती.
यात सुमारे 500 हून अधिक महिला पारंपरिक वेशभूषेत कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
संभाजीनगर शहर आणि परिसरातील 1000 अर्चक पुरोहित 300 शंखनाद केले. पुरोहित आणि 100 वेद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच, शंखनाद वेदमंत्राचा उद्घोष कलशयात्रेत आणि प्रत्यक्ष सभामंडपात ऐकायला मिळणार आहे.