Agriculture: औरंगाबाद जिल्ह्यात पिकं करपू लागली, जमिनीला पडल्या भेगा, पाहा फोटो
ऑगस्ट महिना अक्षरशः कोरडा गेल्याने आता पिकं माना टाकू लागले आहेत. जमिनीला भेगा पडल्या असून, पिकं करपू लागली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त 47 टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी तीन महिन्यांत 110 टक्के पाऊस झाला होता.
तर, 581 मिमीच्या तुलनेत 273 मिमी पावसाचे प्रमाण आहे. त्यामुळे शासन आपल्या दारावर ही योजना राबवण्यापेक्षा शासनाला शेतकऱ्याच्या बांधावर पाठवून पंचनामे करण्याची म्हणी होऊ लागली आहे.
गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने औरंगाबाद जिल्ह्यात खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतातील पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद तालुक्यातील निपाणी परिसरात तर बाजरीचे पिकं अक्षरशः करपू लागली आहे. तर जमिनीला भेगा पडत आहेत.
सध्या कडक उन्हाळा जानवत आहे. मागील काळात झालेल्या रिमझिम पावसामुळे कापूस, बाजरी, मका, तूर आदी पिके कशीबशी तग धरूण आहेत. पण समाधानकारक पाऊस नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने नदी, नाले तहानलेले आहेत. विहीरी, बोअरवेलने तळ गाठला आहे.
भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पावसाअभावी हिरवा चारा उत्पादीत करता येत नसल्याने दुधाचे उत्पादन घटल्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.