Aurangabad : सडलेला थर्माकोल अन् त्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
अवघ्या 7 वर्षांचे लेकरू जीव मुठीत धरून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावरून शाळा गाठत असल्याचे चित्र औरंगाबादच्या भिवधानोरा गावात पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगंगापूर तालुक्यातील हे गाव असून. या मुलांना जायकवाडी धरणाच्या एक किमी बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून प्रवास करावा लागतो.
विशेष म्हणजे हा मतदारसंघ केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांचे आहे.
अथंग पाण्याचा साठा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आणि याच पाण्यात विषारी सापांचा धोका.
विषारी साप थर्माकोलच्या तराफ्यावर येऊन बसू नयेत म्हणून मुलांच्या हातात काठीचा सहारा आणि मनात जीवघेण्या प्रवासाची भीती.
हे चित्र कोणत्याची आदिवासी पाड्यावरील नसून, आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहे.
धरणाच्या बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून एक किलोमीटरचा प्रवास केल्यावर हा संघर्ष थांबत नाही. कारण नदीपात्रातून बाहेर पडताच घनदाट गवत आणि एक फूट पाण्यातून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.
एवढंच नव्हे तर पाण्यात शेतकऱ्यांनी टाकलेल्या विद्युत मोटारीचा धोका देखील कायम असतो.
अंगावर शहारे आणणारा हा प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून भिवधानोरा गावातील विध्यार्थी करतायत.
विशेष म्हणजे पोटच्या लेकरांचा हा जीवघेणा प्रवास पाहता अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं आहे.