औरंगाबादेत फडणवीसांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन, पाहा फोटो
औरंगाबाद शहरातील अयोध्यानगरी मैदानावर आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यातील शासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.
याच प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.
महाआरोग्य आरोग्य शिबीर सामान्य माणसाला असाध्य आजारावरील तपासणी, उपचार मोफत करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.
या शिबिरात साडेतीन लाख नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली हा एक उच्चांक आहे. या शिबिरासाठी विविध दानशूर व्यक्ती,संस्था, वैद्यकीय तज्ज्ञ यांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्धर आजारावरील औषधाच्या किंमती कमी करून सर्वसामान्य लोकांना उपचार स्वस्त केले आहेत. सर्व देशवासियांना कोविडची लस मोफत देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.
देशात अडीच लाख ‘वेलनेस सेंटर’च्या माध्यमातून गरीब लोकांवर उपचार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान आरोग्य कल्याण निधीतून वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळते. वयोश्री योजनेतून वयोवृद्धांना उपचार व सहाय्य साहित्य मोफत दिले जाणार असल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले.
राज्य शासनानेही महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना उपचार मिळणार आहेत, असं फडणवीस म्हणाले.
आरोग्य सेवेचा अधिक विस्तार करण्यासाठी शासनाने राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील 11 वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत. उर्वरीत तीन लवकरच सुरु होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.