धीर सोडू नका! आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी
पावसाने पाठ फिरवल्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे यांनी यावेळी पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी आदित्य ठाकरेंनी झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या. तर, “धीर सोडू नका, आम्ही अहो तुमच्यासोबत, आता सरकारच्या मागे लागू.” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.
आदित्य ठाकरेंनी आपल्या पाहणीची सुरवात पैठण तालुक्यातील निपाणी गावापासून केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी वृद्ध शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाची आणि पिकांची सध्याची परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी मका, कापूस, टोमॅटो, मोसंबी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत बांधावर जाऊन भेट घेतली.
आदित्य ठाकरेंनी जिल्ह्यातील निपाणी, लोहगाव, गुरू धानोरा, मुद्देश वाडगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.
यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.
दरम्यान याच दौऱ्यात त्यांनी बिडकीन गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करत असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट देखील घेतली.