Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन येतात. खास वाघाोबाचे दर्शन करण्यासाठी दूरदूरुन पर्यटक घेतात. पण, अचानक वाघ समोर दिसला तर काय होईल, असेच चित्र येथे पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपुरातील बफर क्षेत्रात मोहर्ली-कोंडेगाव रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानक आला वाघ आल्याने दुचाकीस्वाराची चांगलीच घाबरगुंडी झाली होती.
कोंडेगाव येथून मोहर्लीकडे दुचाकीस्वार येत होता, त्यावेळी रस्त्याच्या बाजूला एका झाडामागे उभा असलेला वाघ रस्ता ओलांडण्याच्या होता तयारीत.
त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा वाघाचं चित्रीकरण करण्यासाठी थांबले होते. त्यामुळे, बंडा यांनी धोक्याचा इशारा केल्याने दुचाकीस्वाराने गाडीचा वेग कमी केला.
जंगलातील वाघापासून अवघ्या काही फुटांवर दुचाकीस्वार थांबला होता, तेव्हा बंडा यांनी बेसावधपणे येणाऱ्या दुचाकीस्वाराला वेळीच सावध केल्याचे त्याचे प्राण बचावले.
सकाळच्या थंडीच्या दिवसात अचानक दुचाकीसमोर वाघोबा आल्याने दुचाकीस्वाराची घाबरगुंडी उडाली, हे सर्व थरारक दृश्य अरविंद बंडा यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
अरविंद बंडा यांनी स्वत: चित्रित केलेला हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यामध्ये, थरारकदृष्य पाहून पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा येईल.