PHOTO : शाळेची इमारत नसल्याने सर्व ऋतू झेलत विद्यार्थी झाडाखाली गिरवत आहेत शिक्षणाचे धडे

शाळेची इमारत धोकादायक असल्याचे सांगत प्रशासनाने पाडून टाकली, मात्र गेल्या तीन वर्षांपासून नवीन इमारतीचा पत्ताच नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ही विदारक परिस्थिती आहे चंद्रपूर शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कढोली गावातील.

मागील तीन वर्षांपासून शाळेची इमारत नसल्याने विद्यार्थी सर्व ऋतू झेलत कधी झाडाखाली तर कधी ग्रामपंचायतीने दिलेल्या समाजमंदिरात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
पावसाळ्यात मुलांना शिकवण्यात अडचणी येतात. पाऊस नसताना विद्यार्थ्यांना झाडाखाली किंवा व्हरांड्यात बसवतो, असं शाळेच्या मुख्याध्यापक अनुजा कुडगे यांनी सांगितलं.
कढोली ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करुनही इमारतीचं प्रत्यक्ष बांधकाम आणि निधीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालढकल होत आहे.
विशेष म्हणजे शाळेला इमारत नसताना देखील शाळेची असलेली 62 ही पटसंख्या कौतुकाचा विषय आहे. मात्र इमारती अभावी ही पटसंख्या कधीपर्यंत टिकणार हाही प्रश्नच आहे.
इथले वर्ग जिल्हा परिषदेत भरवले जातील असा इशारा ग्रामपंचायतीने दिल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कोविड परिस्थितीचे कारण सांगत यात विलंब झाल्याचे मान्य केले असून लवकरच कामाला सुरुवात होईल असा विश्वास दिला आहे.
ज्या ठिकाणी उत्तम इमारती आहेत त्या ठिकाणी शिक्षक नाहीत. जिथे दोन्ही आहे तिथे विद्यार्थी नाही.
मात्र ज्या भागात विद्यार्थ्यांची वानवा नाही त्या भागात उत्तम सुविधा देणे प्रशासनाच्या हातात आहे. तेवढे झाले तरी बरेच सध्या होणार आहे.