बापापुढे पूरही हरला, तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन त्याने काढला मार्ग
chandrapur
1/7
तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन बापाने पुरातून वाट काढली.
2/7
पोराला वाचवण्यासाठी बाप चक्क पुराला भिडल्याची घटना समोर आली आहे. तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन त्याने पाण्यातून मार्ग काढला.
3/7
तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन एका बापाने पुरातून वाट काढल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे.
4/7
गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील आज सकाळची ही घटना असून या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे.
5/7
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं पोडसा गावाला बेटाचं स्वरूप आलंय. त्यातच श्यामराव गिनघरे यांचा मुलगा कार्तिक तापाने फणफणत होता.
6/7
गावात दवाखाना नसल्याने शामराव यांनी मुलाला कडेवर घेऊन या पुरातून वाट काढली.
7/7
गावापासून 5 किलोमीटरवर असलेल्या वेडगाव येथील खाजगी डॉक्टरचे त्याने घर गाठले.
Published at : 14 Jul 2022 03:54 PM (IST)