धक्कादायक! चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

या प्रकारामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले.

Chandrapur

1/6
चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची घटना समोर आली आहे.
2/6
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात स्मशानभूमीला जोडणाऱ्या पायवाटेवर पुलाची निर्मिती रखडली आहे.
3/6
सध्या जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांनी पात्र सोडले आहे. याचा फटका अंत्ययात्रेच्या मार्गाला बसला.
4/6
जवळचा नाला फुगला आणि यातून वाट काढून नागरिकांना स्मशानभूमी गाठावी लागली. स्थानिकांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढत तिरडी कशीबशी सांभाळत अंत्यसंस्कार केले.
5/6
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले.
6/6
त्यामुळे या पुलाची तातडीने निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola