Chandrapur Accident : चंद्रपुरात ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक, 3 तरण्याबांड मुलांचा मृत्यू
Chandrapur Accident : चंद्रपुरात ट्रॅक्टरला दुचाकीनेस्वाराने जबर धडक दिलीये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झालाय.
सावली तालुक्यातल्या बोथली-हिरापूर रोड वरील मार्कंडेय विद्यालयासमोर काल रात्री ही घटना घडलीये.
अपघातानंतर घटनास्थळी एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर आज उपचारादरम्यान गडचिरोली येथे 2 युवकांचा मृत्यू झाला.
तीनही युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात होते.
दरम्यान, हिरापूर येथे जात असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीने दिली जोरदार धडक दिली.
हर्षद दंडावार (वय 18), साहिल गणेशकर (20) आणि साहील कोसमशीले (21) अशी मृत युवकांची नावं आहेत.
दरम्यान, तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
चंद्रपुरात आज अपघाताची दुसरी घटना आहे.
यापूर्वी एका अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू झालाय.