आला रे आला मोठा आयपीओ आला! ग्रे मार्केटमध्येही होतेय चर्चा; पैसे ठेवा तयार
Upcoming IPO: आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण येत्या 22 नोव्हेंबरपासून सी2सी अॅडव्हान्स्ड सिस्टम्स (C2C Advanced Systems IPO) हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या हा आयपीओ जीएमपीवर 109 टक्क्यांच्या प्रीमियमवर पोहोचला आहे.
या आयपीओचा किंमत पट्टा 214-226 रुपये प्रति शेअर आहे. 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात तुम्हाला आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे.
ही कंपनी आयपीओतून 99 कोटी रुपये उभे करणार आहे. Investorgain.com कंपनीचा नुसार सी2सी अॅडव्हान्स्ड सिस्टम्स हा शेअर ग्रे मार्केटवर 245 रुपय्यांच्या प्रीमियमवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
म्हणजेच हा आयपीओ 471 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांना आयपीओत 109 टक्के फायदा होऊ शकतो. 29 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो