Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hanuman Jayanti 2023 : 105 फुटाचा विशालकाय बजरंगबली पाहा फोटो!
असं म्हटलं जातं की प्रत्येक गावात काही वैशिष्ट्य असलं की त्या गावाला त्याची ओळख मिळते....काहीसं असच बुलढाण्यातील नांदुरा या गावाबाबत घडलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदुरा गाव तसं छोटं पण मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग क्र.6 येथून जाण्यापालिकडे या गावाची ओळख नव्हती पण आता नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे ती म्हणजे हनुमान नगरी...
जगातली सर्वात मोठी हनुमानाची मूर्ती म्हणून त्याची ओळख आहे. आज या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक नांदुऱ्यात येतात.
जवळपास पंचवीस वर्षाआधी नांदुरा येथील एक कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन गेला.
त्याठिकाणी एका आंध्रप्रदेशातील व्यापाराला या शेतकऱ्याचा कांद्याचा दर्जा आवडला. त्याने या शेतकऱ्याला कांदा कुठला अशी विचारपूस केली असता त्याने नांदुरा अस सांगितलं .
आंध्रप्रदेशातील या शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन याठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचं ठरवलं.
मोहनराव हे बालाजींचे भक्त असल्याने त्यांनी याठिकाणी 1999 साली बालाजी ट्रस्ट स्थापन केलं. हनुमान हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी नांदुरा येथे हनुमानाची भव्य व विशालकाय मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय 2000 साली घेतला.
त्याकाळी अशी मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च येणार होता. त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातून मूर्तीकार आणून ही मूर्ती घडविली. या मूर्तीच्या बाजूलाच बालाजी चे भव्य व आकर्षक असे मंदिर ही बांधण्यात आले आहे.
आंध्रप्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मुर्तीकाराने ही मूर्ती तब्बल 210 दिवस अथक प्रयत्नातून साकारली आहे. ही 105 फूट उंच हनुमंताची मूर्ती अतिशय सुंदर व सुबक आहे.
मूर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेलं टिळक लावलेलं आहे. मूर्तीमध्ये एक इंच ते 12 इंच साईझ चे जवळपास एक हजार कृत्रिम डायमंड लावलेले आहेत.
मूर्तीचे डोळे 27 इंच बाय 24 इंच या आकाराचे असून मानवाचे कृत्रीम डोळे बनविणाऱ्या कंपनीत ते बनविले गेले आहेत. मूर्तीला दररोज जलाभिषेक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच मूर्तीला साडे तीन क्विंटलचा हार रिमोट द्वारे चढविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. हनुमान हे बालाजींचे भक्त असल्याने शेजारीच कोट्यवधी रुपये खर्च करून बालाजी मंदिर बनविण्यात आलंय.
सुंदर असे हे मंदिर आहे. तर या ठिकाणी एक नेत्र रुग्णालय सुद्धा चालविण्यात येत आहे
एकंदरीत जगातील या उंच व विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची गिनीज बुक ऑफ लिम्का ने सुद्धा 2003साली दखल घेतली आहे. दररोज याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.