Buldhana News: सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं? योग्य भाव नसल्याने शेतकऱ्याने कोबीच्या शेतात घातल्या मेंढ्या
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमहीतील शेतकऱ्यानं मेंढ्यांना कोबीचं शेत चरायला दिलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारात कोबीला भाव नाही, बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथील शेतकरी मधुकर शिंगणे यांना एकरी ६० हजार रुपये खर्चून कोबी पिकवला.
दीड एकरातील कोबीच्या शेतात आज मेंढ्यांना चरायला द्यायची वेळ आली आहे.
बाजारात कोबीला भाव नाही, बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही
यामुळे शेतकरी अडचणीत आला असून नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यानं कोबीच्या शेतात चक्क मेंढ्या चरायला घातल्या.
शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
तीन महिने कष्ट करुन पिकविलेल्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
पिकाच्या काढणीचा खर्च देखील मिळालेल्या दरातून निघत नाही.