PHOTO : बुलढाण्यातील शाळेतील निम्म्याहून अधिक विद्यार्थी घेतात मदरशात शिक्षण
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी मदरशात शिक्षण घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त नावापुरतंच नाव टाकलं जात का? असा सवाल उपस्थित होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील आलेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत असा प्रकार घडतोय.
शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून फक्त दोन खोल्यांत या शाळा भरतात. या शाळेत पाच शिक्षक असले तरी दररोज ते उपस्थित राहत नसल्याचं समोर आलं आहे.
शाळेतील सर्व वर्गातील एकूण पटसंख्या 161 असल्याचं शाळेच्या हजेरी पटावरून लक्षात येत खरं. मात्र केवळ 33 विद्यार्थी या शाळेत उपस्थित असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विद्यार्थी कुठे गेले असं विचारल्यानंतर ते नमाजासाठी गेल्याचं शिक्षकांनी सांगितलं.
इतर मुलं शाळेत का येत नाहीत किंवा ते कुठे गेले असा प्रश्न तालुकास्तरावर असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांना विचारला.
शिक्षण अधिकारी म्हणतात काही मुलं मदरशात शिक्षण घेतात, कारण मदरशाची आणि आमच्या शाळेची वेळ भिन्न आहे. पण त्यामुळे आमच्या शैक्षणिक कार्यात काही बाधा येत नाही.
या बाबतीत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली. जिल्ह्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी हे मदरशात शिकत आहेत का? या प्रश्नावर त्यांनी सरळ नाही असं उत्तर दिलं.
सर्व विद्यार्थी हे सरल पोर्टलला, आधार कार्डला जोडले आहेत. त्यामुळे हे शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शाळेतील विद्यार्थी गैरहजर का? या प्रश्नावर ते काही बोलले नाही.