Buldhana Crime News: संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; प्रियकराने प्रेयसीला संपवलं अन् स्वत:लाही भोसकून घेतलं, खामगावच्या जुगनू हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Buldhana Crime News: प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं. सोनू राजपूत व पायल पवार असं या प्रेमीयुगोलाचे नाव असून दोघेही साखरखेर्डा गावातील होते.

Continues below advertisement

Buldhana Crime News

Continues below advertisement
1/12
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे एक तरूण व तरूणीचा मृतदेह (Buldhana Crime News) बंद खोलीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठा जमाव जमला होता.
2/12
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती.
3/12
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. खामगाव शहरातील हॉटेल जुगनूमधील या थरारक हत्याकांडाने शहर हादरलं आहे.
4/12
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बायपास परिसरात असलेल्या हॉटेल जुगनूमध्ये काल (मंगळवारी, ता 23) सायंकाळी जिल्ह्यातीलच साखरखेर्डा येथील प्रेमीयुगोलाने रूम भाड्याने घेतली.
5/12
दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं. सोनू राजपूत व पायल पवार असं या प्रेमीयुगोलाचे नाव असून दोघेही साखरखेर्डा गावातील होते. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
Continues below advertisement
6/12
यावेळी खामगाव शहरात माहिती पसरतात मोठा जमाव या हॉटेल परिसरात जमला होता. यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य बळाचा वापरही करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही तीन ते चार वर्षापासून प्रेम संबंधात होते.
7/12
याप्रकरणी मिळालेल्या आधिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. या घटनेत दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उजेडात आली.
8/12
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये २१ वर्षीय युवती व सोनू उर्फ साहिल राजपूत (२३, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता.
9/12
त्यातूनच साहिलने हॉटेलात युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
10/12
हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला.
11/12
घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःला धारदार शस्त्राने भोसकून आत्महत्या केली.
12/12
या घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी तपासात समोर येत असून, पुढील तपास सुरू आहे.
Sponsored Links by Taboola