Britain King Charles : ब्रिटनचे किंग चार्ल्स III प्रोस्टेट कॅन्सरनं ग्रस्त..
ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबकिंघम पॅलेसनं एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. (Photo Credit : PTI)
बकिंगहॅम पॅलेसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजा चार्ल्स तिसरा कर्करोगानं ग्रस्त आहे. प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी केली असता,त्यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. (Photo Credit : PTI)
किंग चार्ल्स कर्करोगानं ग्रस्त असल्याच्या वृत्तानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ते लवकरच पूर्ण ताकदीनिशी परततील यात मला शंका नाही, असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं आहे. (Photo Credit : PTI)
राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर, राजा चार्ल्स तिसरा ब्रिटनचा राजा झाला. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा राज्याभिषेक झाला होता. यानंतर त्यांना राजा चार्ल्स तिसरा असं संबोधलं जातं. (Photo Credit : PTI)
वयाच्या 73 व्या वर्षी तो राजा झाला. चार्ल्स यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी बकिंगहॅम पॅलेस येथे झाला. (Photo Credit : PTI)
1969 मध्ये, वयाच्या 20 व्या वर्षी, त्यांची राणीनं कॅर्फर्नॉन कॅसल येथे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून नियुक्ती केली. (Photo Credit : PTI)
चार्ल्स यांनी 29 जुलै 1981 रोजी लेडी डायना स्पेन्सरशी लग्न केलं. त्या लग्नातून त्याला प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी ही दोन मुलं झाली. (Photo Credit : PTI)
28 ऑगस्ट 1996 रोजी हे लग्न तुटलं. (Photo Credit : PTI)
9 एप्रिल 2005 रोजी त्यानं कॅमिला यांच्याशी लग्नगाठ बांधली. (Photo Credit : PTI)