Bhiwandi Rain: भिवंडीत पावसाची जोर 'धार'! मुख्य रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, कामवारी नदीनेही ओलांडली धोक्याची पातळी

Bhiwandi Rains : भिवंडी शहर व ग्रामीण भागात पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. भिवंडीत रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केलं आहे.

Continues below advertisement

Mumbai Rains

Continues below advertisement
1/7
Mumbai Rains : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईतील बहुतांश भागात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. तर आज मंगळवारी (दि. 24) सकाळपासून मुंबईत (Mumbai News) ढगाळ वातावरण आहे.
2/7
अशातच या पावसाचा कहर भिवंडी शहर व ग्रामीण भागात देखील पाहायला मिळाला आहे. भिवंडीत रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केलं आहे.
3/7
शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून अनेकांच्या घर आणि दुकानात ही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे.
4/7
यात बाजारपेठातील अनेक दुकानं पाण्याच्या तडाख्यात सापडली असून खाडीपार परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे.
5/7
यात प्रामुख्याने भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपार, तीनबत्ती परिसरात पाणी पाणीच झाल्याचे बघायला मिळाले असून रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होतं.
Continues below advertisement
6/7
दुसरीकडे कामवारी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठच्या वसत्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
7/7
दरम्यान, आजपासून दि. 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती (High tide at sea) येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात (Monsoon 2025) तब्बल 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे.
Sponsored Links by Taboola