भूसंपादन न करता शेतातून गेला रस्ता, शेतकऱ्यानं पाण्याच्या टाकीवर चढून केलं आंदोलन
भूसंपादन न करता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या शेतीतून पक्का रस्ता तयार करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचा आर्थिक मोबदला मिळाला नसल्याने त्याच्या मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या बारव्हा येथे प्रकाश नाकतोडे या शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दिवसभर चाललेल्या नाट्यमय आंदोलन सात तासानंतर समाप्त झाले.
एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्यांनी दिले लिहून....शेत पिकांचे नुकसान भरपाई आणि भूसंपादनाच्या आर्थिक मोबदल्यासाठी आंदोलन....
लाखांदूर तालुक्यातील प्रकाश नागतोडे यांच्या सासूच्या नावाने शेत जमीन आहे. या शेतजमिनीमधून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पक्का रस्ता तयार करण्यात आला.
लाखांदूर तालुक्यातील प्रकाश नागतोडे यांच्या सासूच्या नावाने शेत जमीन आहे. या शेतजमिनीमधून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पक्का रस्ता तयार करण्यात आला.
प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी प्रकाश नाकतोडे यांनी शेतीच्या नुकसानीचा आणि भूसंपादनाचा आर्थिक मोबदला मिळावा, यासाठी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.
दरम्यान, प्रशासकीय अधिकारी मागण्या मान्य करीत नसल्याचे दिसून येताच, आंदोलक नाकतोडे यांनी दुपारी स्वतःवर केरोसीन टाकून जाळून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
आंदोलनाचा धसका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेत आंदोलक शेतकरी यांच्या मागण्या मान्य केल्यात आणि एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रकाश नाकतोडे यांना मोबदला देण्याचे लिहून दिल्यावर तब्बल सात तासानंतर आंदोलन मागे घेतल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.