Bhandara News : मोठी बातमी! ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोटात मृतांचा आकडा पोहोचला 6 वर; घटनेची दाहकता दाखवणारे Photos आले समोर
Bhandara News : भंडाऱ्यातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत.
Bhandara News Ordnance factory blast
1/8
भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना आज (24 जानेवारीला) घडली आहे.
2/8
या दुर्घटनेत काही कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यातील सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर तीन कामगारांवर भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
3/8
हा स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर एलटीपी प्लांटच्या बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत.
4/8
सोबतच बिल्डिंगच्या काही स्लॅबच्या भागाचेही तुकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटात दूरवर फेकल्या गेलेत. तर या इमारतीच्या मलब्याखाली तिथे काम करणारे 14 कर्मचारी दबले असल्याची माहिती पुढे आली आहे.
5/8
आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोटानंतर इमारत कोसळली असून त्याचे फोटो आता पुढे आले आहे.
6/8
दरम्यान, या इमारतीच्या मलब्याखाली आणखी काही कामगार दबले असून त्यांना काढण्याचे काम एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक करत आहे. या स्फोटाची भीषणता दाखवणारे फोटो पुढे आले आहेत.
7/8
दरम्यान, आता या दुर्घटनेत आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
8/8
हा स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर एलटीपी प्लांटच्या बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत. सोबतच बिल्डिंगच्या काही स्लॅबच्या भागाचेही तुकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटात दूरवर फेकल्या गेलेत.
Published at : 24 Jan 2025 06:04 PM (IST)