Rain : भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग
राज्यातील काही जिल्ह्याच चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा (Bhandra) जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत असल्यामुळं गोसीखुर्द धरणाच्या (Gosikhurd Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
गेल्या 48 तासापासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे 25 गेट उघडले आहेत. धरणातून 97232 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे.
पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत.
नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा सातत्यानं विसर्ग होत असल्यानं आणि सुरू असलेल्या पावसानं भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचं पात्र आता दुथडी भरून वाहू लागलं आहे.
मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदी दथडी भरुन वाहत आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला