भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली
भंडारा जिल्ह्यात आज सायंकाळी ताशी 50 किमीच्या वेगानं वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यात पवनी-लाखांदूर मार्गावरील रस्त्यालगतची अनेक वृक्ष रस्त्यावर कोसळल्यानं हा मार्ग बंद होता.
Continues below advertisement
Bhandara heavy rain tree collapse
Continues below advertisement
1/8
भंडारा जिल्ह्यात आज सायंकाळी ताशी 50 किमीच्या वेगानं वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यात पवनी-लाखांदूर मार्गावरील रस्त्यालगतची अनेक वृक्ष रस्त्यावर कोसळल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बराच वेळ बंद होता.
2/8
रस्त्यावर कोसळलेली झाडे प्रशासन, स्थानिक नागरिक आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या मदतीनं हटविले आहेत. खोळंबलेला वाहतुकीचा मार्ग तब्बल तीन तासानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
3/8
सायंकाळी 5 वाजतापासून वाहतूक खोळंबल्यानं दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री 8 वाजताच्या सुमारास वाहतूक सुरू झाली.
4/8
एसटी बससह, चारचाकी , दुचाकी वाहनांमधील प्रवासी खोळंबले होते, तेव्हा शेकडो वाहन चालकांना गर्दीतून मार्ग काढताना वाहतुकीच्या खोळंब्याला सामोरे जावं लागलं.
5/8
प्रचंड वेगानं आलेल्या वादळानं अनेकांच्या घरावरील टीन पत्रांसह कौलारू घरांवरील छत उडालेत.अनेकांच्या शेतातील सोलर पॅनलही उडाले असून बागायती शेतीचं नुकसान झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
Continues below advertisement
6/8
भंडाऱ्याच्या ऐतिहासिक पवनी शहरातील चंद्रमणी मैदानावर उभारण्यात आलेली भगवान गौतम बुद्धांची 51 फूट उंचीची मूर्ती देखील वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना घडली.
7/8
पवनी येथील चंद्रमणी बुद्ध विहार कमिटीच्या माध्यमातून लोकवर्गणीतून ही मूर्ती उभारण्यात आली होती. या मूर्तीचं सध्या रंगकाम करण्यात येत असताना आज सोसाट्याच्या वादळी वाऱ्यात ही मूर्ती कोसळली.
8/8
दरम्यान, परभणीतही वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस बरसला. संध्याकाळी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली होती. जून महिन्यातला हा पहिलाच मोठा पाऊस झाला.
Published at : 10 Jun 2025 09:36 PM (IST)