वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी; खासदारांनीच बनवला व्हिडिओ
भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. मात्र, लाईट गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
Bhandara rain prashant padole
1/7
भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. मात्र, लाईट गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
2/7
सायंकाळच्या सुमारास सुमारे अर्धा ते पाऊण तास पडलेल्या या मुसळधार अवकाळी पावसानं साकोली शहरातील आठवडी बाजारातील शेतकरी, व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं.
3/7
वादळी वाऱ्यानं वीज जनित्रांमध्ये बिघाड निर्माण झाल्यानं भंडारा शहरासह ग्रामीण भागातील दोन तास वीज पुरवठा खंडीत झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागलं.
4/7
अवकाळी पावसानंतर भंडारा शहरासह ग्रामीण भागात दोन तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा इथं उड्डाण पुलावर पाणी साचलं
5/7
इथून जाणारे खासदार प्रशांत पडोळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिथं थांबून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला.
6/7
पहिल्याचं अवकाळी पावसात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावरील परिस्थिती दाखवणारा हा त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
7/7
या अवकाळी पावसानं उन्हाळी भात पिकाला संजीवनी मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या घरात पोहचलंय.
Published at : 27 Apr 2025 09:52 PM (IST)