Bhandara : कर्जासाठीच्या जाचक अटींमुळे धान भरडाई खोळंबली , भंडाऱ्यातील 400 भात गिरण्या बंद
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, कर्जासाठीच्या जाचक अटींमुळे भंडारा जिल्ह्यातील राईस मिलधारक धान भरडाई करण्यास इच्छुक नाहीत.
परिणामी जिल्ह्यातील सुमारे 400 भात गिरण्या बंद पडल्या आहेत.
विक्रमी धान खरेदी होऊनही मिलिंग गतिमान होत नसल्याचे दृश्य जिल्ह्यात बघायला मिळतंय
मजूर कामाविना बसले आहेत.
मिलिंगसाठी दिलेल्या जवळपास 403 क्विंटलच्या प्रति लॉटसाठी गिरणी धारकांना 2,400 रुपये देण्यात आले
9 लाख 67 हजार 200 नुसार बँक गॅरंटी अनिवार्य आहे.
प्रतिक्विंटल 67 किलो तांदूळ देण्याची अटही घातली आहे.
मिलर्स या अटी पूर्ण करू शकत नाहीत, आतापर्यंत जिल्ह्यातील 400 पैकी केवळ 69 गिरणीधारकांनी बँक हमीपत्र सादर केले आहे.
त्यामुळे जिल्ह्यात 37 लाख 10 हजार 45 क्विंटल खरेदीच्या तुलनेत आतापर्यंत गिरणी धारकांनी 1 लाख 95 हजार 511 क्विंटल धान जमा करून केवळ 17 हजार 462 क्विंटल तांदूळ जमा केला आहे.
शेतकऱ्यांसमोर सातत्यानं नवनवीन संकट येत असतात.
संकटावर मात करुन शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत.