PHOTO : समाधान शर्मा महाराज कोण आहेत?
रामकथाकार तसंच कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली सांगली ते वाघोली हेलिकॉप्टर वारी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना वाघोली इथल्या कीर्तनासाठी पाच तास उशीर होत असल्यामुळे आयोजकांनी थेट हेलिकॉप्टर पाठवून महाराजांना आणण्याची व्यवस्था केली.
यामुळे पाच तासांचा प्रवास अवघ्या 55 मिनिटात झाल्याने महाराष्ट्रात समाधान महाराजांची हेलिकॉप्टर 'वारी' चांगलीच चर्चेत आहे. समाधान महाराज शर्मा कोण आहेत ते जाणून घेऊया....
ह.भ.प समाधान महाराज शर्मा हे मूळचे बीड जिल्ह्यातल्या केज येथील रहिवासी आहेत.
गेल्या 30 वर्षापासून ते राज्यातल्या वेगवेगळ्या भागात रामकथा सांगतात.
कीर्तनकारांच्या तुलनेत राम कथा सांगणाऱ्या महाराजांची संख्या खूप कमी आहे
त्यामुळे राज्यात राम कथा सांगणाऱ्या ठराविक महाराजांपैकी शर्मा महाराज हे एक आहेत..
राम कथा ही सात दिवस चालत असते..
त्यामुळे राज्यात ज्यांना राम कथा लावायची आहे त्यांना काही महिने आधी या महाराजांच्या तारखा घ्याव्या लागतात