Beed Rain News : बीडच्या शिरूर कासार शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस; सिंदफना नदीला पूर, बाजारपेठसह अनेकांच्या घरांमध्ये पाणीच पाणी

राज्यभरात अनेक ठिकाणी तुफान पाऊस झाला असून, पावसामुळे झालेल्या नुकसानाला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.

Continues below advertisement

Beed Rain News

Continues below advertisement
1/3
शिरसाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास 200 -300 लोक अडकलेले आहेत.
2/3
दुसरीकडे, धाराशिवच्या भूम आणि परांडा तालुक्यात पावसाचा हाहाकार बघायला मिळाले आहे. चांदणी नदीने रौद्ररूप धारण केलं असून सिरसाव गावातील शाळा, सरकारी दवाखान्यासह अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान अनेक घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे.
3/3
मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरसदृश्य परिस्थिती दिसून येते आहे. घरांसह नदीकाठचे दुकानं सध्या पाण्यात आहे. सुदैवाने कसलीही जिवितहानी झाली नाही.
Sponsored Links by Taboola