PHOTO : मराठा आरक्षणासाठी वकिलांकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बीडमधील वकिलांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं त्याचबरोबर सरकारने टिकेल असं आरक्षण तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरु असलेल्या साखळी उपोषणात महिला वकिलांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
आरक्षणासाठी अनेक मराठा तरुणांनी आपलं बलिदान दिलं आहे, तर दुसरीकडे तुमच्या शिक्षण घेऊन देखील आरक्षण नसल्यामुळे अनेक तरुणांना नोकरीमध्ये संधी मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मराठा समाजाची अवस्था बिकट झाली असून सरकारने तात्काळ आरक्षणाचा विचार करावा आणि कोर्टात टिकेल असं आरक्षण जाहीर करावा अशी मागणी या वकील बांधवांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.
यावेळी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे विनायक मेटे यांच्या फोटोला हार घालून अभिवादन देखील करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठींबा असून, यासाठी आज वकील संघाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आल्याची माहिती वकील संघाचे पदाधिकारी प्रशांत राजापूरकर यांनी दिली आहे.