Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मेळाव्याला किती गर्दी?; ड्रोनशूटचे फोटो पाहून उंचावतील भुवया
बीड जिल्ह्यातील नारायण गडावर यंदा पहिल्यांदाच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज बांधव नारायण गडावर मेळाव्यासाठी जमले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरागे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच अग बया बया बया.. असे म्हणत नारायण गडावर नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं म्हटलं. तसेच, मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो, असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी ते नारायणगड अशी 30 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. बीडकडे येणाऱ्या चारही मार्गावर चक्का जाम झाला असून नारायण गडावरील मैदान मेळव्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेलंय.
मला खरंच वाटलं नव्हतं की, नजर फिरेल इथपर्यंत तुम्ही येताल. एकजण म्हणत होता, हाहहाहा 500 एकर असतंय का, पण, गर्दी पाहून त्यांचा कार्यक्रमच होईल.
मीडियाच्या बांधवांनी जरा गर्दीकडे कॅमेरे फिरवावेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीवरुनच ओबीसीमधील काही नेत्यांना व राज्य सरकारला इशारा दिलाय.
बीडच्या पाठीमागे सगळे रस्ते जाम आहेत, 500 एकर परिसरात सगळं मैदान भरलंय. मी तुमच्यासमोर आज नतमस्तक होतो, एवढी गर्दी पाहून, नजर जाईल तिथपर्यंत मराठ्यांचा समुद्रच आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटंलय.
जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला मोठी गर्दी नारायण गडावर जमली असून या गर्दीचे ड्रोनशूटमधील फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये, 500 एकरचं मैदान तुडूंब भरलं असून लांबच्या लांब माणसांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
जरांगे पाटील यांच्या मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी केलेली गर्दी या मेळाव्याची व मनोज जरांगे यांची ताकद दाखवणारी आहे.