PHOTO: मकरसंक्रांतीला सौभाग्याचं लेणं विधवांच्याही पदरी; बीडमधील अनोख्या उपक्रमाचं होतंय कौतुक
मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात.
याच मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं
बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी मकरसंक्रातीचा सोहळा रंगला.
प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रांतीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात..
विधवा झाल्यानंतर आपल्याला जी वागणूक मिळाली ती इतर महिलांना मिळू नये म्हणून या दोघींनी या उपक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमात शंभरच्या वर विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप करण्यात आलं.
आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक महिलांनी संक्रांतीचा सण साजरा केला नव्हता.
आज मात्र या ठिकाणी या महिलांचा जो सन्मान झाला तो पाहून या महिला भारावून गेल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा गोडवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
कुणाला अपघाताने तर कुणाला नशिबाने अकाली विधवापण येते म्हणून त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणूनच कुकंवा पलीकडची ही संक्रांत आपल्या समाजा समोरचा मोठा आदर्श म्हटला पाहिजे.